पुण्यात  रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पूलावर पाण्याचे लोंढे वेगाने वाहत रस्त्यावर येत होते. कात्रज पूलावर वाहतूक कोंडी झाली होती. तर, शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराच्या परिसरात पावासाच्या पाणी वहात होते. एकूणच पुणे शहरातील सर्वच रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप आलेले पाहायला मिळाले.

पुणे शहरात पुन्हा धुवाधार पाऊस झाला. रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे वेगाने वाहणारे लोट दिसून येत आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागला.

पुण्यात झालेल्या पावसाने रिक्षेसह ओला, उबेर या ऍपवरून कॅबची मागणीत प्रचंड वाढ वाढली. त्यामुळे या सेवांच्या भाडेही अव्वाच्या सव्वा वाढले. त्यातही जवळचे अंतर घेण्यास नकार देत होते. तसेच, लांबच्या भाड्याला प्राधान्य देत होते. रिक्षा किंवा कॅब मिळत नव्हत्या. त्यामुळे रात्री नऊ वाजल्यानंतर घरी जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले.

Web Title: Rain water in residential areas and road in pune
 
संबंधित बातम्या

Saam TV Live