एकीकडे कोरोना, दुसरीकडे पावसाने उडवले डोक्यावरचे छप्पर!..(पहा व्हिडिओ)

विश्वभूषण लिमये
रविवार, 9 मे 2021

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात बार्शीतील नागोबाची वाडी येथे राहणाऱ्या दत्ता पिसे यांचे घर अक्षरशः उडून गेले आहे.  घरातील संपूर्ण साहित्य हे आता उघड्यावर पडलेलं आहे

बार्शी : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात बार्शीतील नागोबाची वाडी येथे राहणाऱ्या दत्ता पिसे यांचे घर अक्षरशः उडून गेले आहे.  घरातील संपूर्ण साहित्य हे आता उघड्यावर पडलेलं आहे. कोरोनाच्या अशा भयाण काळात घरदारही उडून गेल्याने आता या परिवाराची परिस्थिती फारच हालाखीची झाली आहे. Rains played havoc in Barshi Tehsil 

मात्र अशा स्थितीतही गावातल्या लोकांनी जमेल ती मदतही केली. मात्र लॉकडाउनमुळे आधीच रोजगार गेल्यानंतर अशा तुटपुंज्या मदतीने काहीच होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. गावकऱ्यांनी दाखवलेलं औदार्य आता प्रशासनानेही दाखवून या कुटुंबाला मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील वैरागमध्ये जोरदार पावसाबरोबरच गारा आणि सोसाट्याचा वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर कांही ठिकाणी झाड ही उन्मळून पडली आहेत.  तर कांही दुकानांवरचे पत्रेही उडून गेले आहेत. अचानक आलेल्या या वादळी वारा आणि पावसामुळे वैरागकरांची भंबेरी उडाली. पावसामुळे घर-दुकानांची पत्रे उडाल्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागले आहे.

अंबरनाथमध्ये मनसेने उघडकीला आणला रेमडिसिवीरचा काळाबाजार

नांदेडमध्येही पाऊस
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आज दुपारी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय... या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे...उन्हाळी ज्वारी, सोयाबीन  आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालय...अंबा पिकांच ही नुकसान झालय.. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारी साठी मशागतीच्या कामाला लागले आहेत... मात्र, माहुर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मशागतीची कामं आता खोळंबली आहेत. Rains played havoc in Barshi Tehsil 

हवामान अंदाज:-
 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार *दिनांक ९ मे रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात  तुरळक ठिकाणी वादळीवारा,  विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची  शक्यता आहे. *दिनांक १० मे रोजी लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात*  तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत घरा बाहेर पडताना काकळजी घ्यावी, तसेच झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पसुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live