राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनलंय राजभवन... वाचा रंगलेल्या राजकारणाचे काही महत्वाचे मुद्दे

साम टीव्ही
मंगळवार, 26 मे 2020

गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांच्या बैठका होत असतानाच ,राज्यपालांच्या भेटींचाही सिलसिला सुरूय. 19 मे रोजी देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. तर संजय राऊत यांनी 23 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही 25 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली. 

गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांच्या बैठका होत असतानाच ,राज्यपालांच्या भेटींचाही सिलसिला सुरूय. 19 मे रोजी देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. तर संजय राऊत यांनी 23 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही 25 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली. तर नारायण राणे यांनीही 25 मे रोजीच राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडतायत. त्यातच राज्यपालांच्या भेटींचा सिलसिला जोरात असल्याने महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राजभवन बनल्याचं चित्र निर्माण झालंय.

शरद पवार आणि राज्यपाल यांच्यात काय चर्चा?

उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे, त्यांना पाठिंबा देणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी मजबूत उभे आहेत. अशी माहिती शरद पवार यांनी साम टीव्हीला दिलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिनही पक्ष एकत्र आहेत. कोरोनाच्या या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर काढायचंय.  यासाठी सगळी ताकद लावायची आहे, हे सध्या उद्धिष्ट आहे. तिन्ही पक्षांची हीच भूमिका आहे. कोष्यारी राज्यपाल झाल्यापासून आपण त्यांना एकदाही भेटलो नव्हतो, त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आपण त्यांना भेटायला गेलो.. असंही शरद पवारांनी म्हंटलंय.
मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत असून तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. 
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन परवारांनी भेट घेतली. त्यावरही त्यांनी खुलासा केलाय. उद्धव ठाकरे आणि मी एकदा आढावा घेतो, आम्ही नेहमी स्मारकवर भेटतो, मात्र यावेळी मीच मातोश्रीला येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. तिथेही कोरोनाबाबत आढावा घेतला असं शरद पवार यांनी म्हंटलंय. सध्या कोणताही राजकीय विषय नसून याकाळात कोण राजकीय विषयावर बोलणार असंही शरद पवार म्हणालेत.

 मातोश्रीवर गुप्त बैठक

मातोश्रीवर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीची महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली... या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि संजय राऊत या तिघांचीच उपस्थिती होती. कोरोनाशी दोन हात करत असताना, एवढ्या रात्री तातडीची गुप्त बैठक घेण्यामागचं कारण काय? अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्रात महाराष्ट्राबाबत पडद्यामागे काहीतरी घडत असल्याची कुणकुण पवारांना लागल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही गुप्त बैठक पार पडल्याचं सांगितलं जातंय.  महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवावा किंवा कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून हे सरकार बरखास्त करावं. आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी भाजपची व्यूहरचना असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान ठाकरे सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप खासदार नारायण राणेंनी राज्यपालांकडे केलीय.

शिवसेनेचा भजपला आग्रलेखातून चिमटा

त्यातच आता शिवसेना मुखपत्रातून भाजपला चिमटा काढण्यात आलाय. पॅकेजची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना अग्रलेखातून सुनावण्यात आलंय. रिकामी खोकी, रिकामी डोकी, गुजरातकडे बघा, अशा मथळ्याखाली भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. तसंच विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धाळ अडथळे आणीत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. गुजरातमधील परिस्थितीची पाहणी एकदा राज्यातील भाजप नेत्यांची करुन यायला हवी, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आलाय. त्यानंतरच महाराष्ट्राची तयारी काय आहे, हे विरोधी पक्षाच्या लक्षात येईल, असं शिवसेनेने म्हटलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live