कोस्टल रोडवरून राज-उद्धव आमने-सामने

कोस्टल रोडवरून राज-उद्धव आमने-सामने

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्पाचे एकीकडे आज (रविवार) दुपारी 4 वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन होत असताना दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी 9 वाजता वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवाची भेट घेवून त्यांच्या समस्य़ा जाणून घेतल्या आहे. त्यामूळे कोस्टल रोडवरून राज-उद्धव आमने-सामने होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोडचा पर्याय निवडण्यात आला. मात्र हा कोस्टल रोड मच्छिमारांच्या जिवावर उठला असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. त्यासाठी आता कोस्टल विरोधात राज ठाकरे यांनीही कंबर कसली असून मनसेने कोस्टल रोडला विरोध दर्शविला आहे. पारंपारीक मासेमारी धोक्यात येवू नये यासाठी आयुक्तांची भेट घेवून समस्या मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

काय आहे कोस्टल रोड प्रकल्प
पश्चिम उपनगरांमध्ये कमी वेळात पोहचता यावे, यासाठी कोस्टल रोड  उभारत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे-वरळी सागरी सेतू पर्यंत ९.९८ किलोमीटर लांबी हा मार्ग असून या कामासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Web Title: Raj Thackeray and Uddhav Thackeray face to face on costal road in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com