वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; माझ्या वाढदिवशी..  

raj thackeray.jpg
raj thackeray.jpg

वृत्तसंस्था :  येत्या 14 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra Navnirman Sena अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray  यांचा वाढदिवस आहे. मात्र गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसापूर्वी birthday कार्यकर्त्यांना भेटीला न येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहून सद्य स्थितीवर भाष्य करत भेटायला न येण्याचे आवाहन केले आहे.  दरवर्षी वाढदिवशी तुम्ही मला राज्यभरातून भेटायला येत असता. मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद होतो.  मात्र हेही वर्ष बिकट आहे.  त्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नका.   या कोरोनाच्या संकट काळात वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही.  राज्यात अद्यापही कोरोनाचा विळखा कायम आहे. त्यामुळे आताही खबरदारी घेत बाहेर पडण, बाहेर प्रवास करणं टाळा.  अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray appeals to his party workers on the occasion of his birthday) 

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पत्र शेयर  करत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणाहून तुम्ही फार प्रेमानं  दरवर्षी माझ्या वाढदिवसाला भेटायला येत असता.  तुम्हाला भेटल्यावर मलाही आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पहात असतो. पण या कोरोनाच्या संकट काळात वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मात्र अद्याप कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही.  हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदाला यायला लागलं आहे. परंतु, परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२, २०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणं मनाला पटत नसल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

त्याचबरोबर,  माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. अशा वातावरणात आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेऊन प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मनःपूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच रहा. जिथे आहात तिथे सुरक्षित रहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी या पत्रातून केली. 

तुम्ही प्रेमानं याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला तुम्ही सर्वांनी ह्या कोरोना काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात रहा. अजूनही आपली माणसं दुःखात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवानं आपल्याला सोडून गेले. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या. त्यांच्यासाठी आत्ता करता आहात तसंच काम करत रहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा, असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे. 

त्याचबरोबर, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर समाजोपयोगी कामांमध्ये रहा, थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आत्ता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन, अशा शब्दांत त्यांनी पत्राद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Edited by - Anuradha Dhawade 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com