'कितीही चौकशी केली, तरी तोंड बंद ठेवणार नाही' - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

मुंबई - 'कितीही चौकशी केली, तरी थोबाड बंद ठेवणार नाही', अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर भाजपला इशारा दिला आहे. ईडी कार्यालयात तब्बल पावणेनऊ तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर ते आपल्या कृष्णकुंज या घरी परतले. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल पावणेनऊ तास कसून चौकशी केली. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली राज यांची चौकशी 8.15 वाजता संपली. यानंतर राज आपल्या वाहनाने कृष्णकुंजवर परतले. या वेळी कृष्णकुंजच्या बाहेर मनसैनिकांनी मोठी गर्दी केली. राज ठाकरे गाडीतून उतरताच मनसैनिकांनी एकच जल्लोष केला. अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. राज यांनीही काही वेळ थांबून चेहऱ्यावर स्मितहास्य आणत कार्यकर्त्यांना धीर दिला. प्रसारमाध्यमांनी राज यांना ईडी चौकशीबाबत विचारले असता, "मी त्यांना सांगून आलोय, तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. कितीही चौकशा केल्या, तरी थोबाड बंद ठेवणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली.

WebTitle : Raj Thackeray Edi Inquiry

संबंधित बातम्या

Saam TV Live