मराठी मनोरंजन क्षेत्रातील अडचणींचा राज ठाकरेंकडून आढावा

वैदेही काणेकर
गुरुवार, 20 मे 2021

नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला आणि समस्या समजून घेतल्या. 

मुंबई : मराठी Marathi मनोरंजन Entertainment क्षेत्रासमोर Field सध्याच्या कोरोना Corona काळात ज्या अडचणी Problems निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा Review आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी घेतला.  Raj Thackeray Reviews Problems In The Field Of Marathi Entertainment

नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या ‘झूम’ Zoom माध्यमातून संवाद Dialog साधला आणि समस्या समजून घेतल्या. 

हे देखील पहा -

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावे आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या आहेत.  Raj Thackeray Reviews Problems In The Field Of Marathi Entertainment

एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

भायखळ्यात डोक्यात दगड टाकून महिलेचा खून

दोन दिवसात या विषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्यासंदर्भात त्यांनी तयारी दर्शवली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live