राज ठाकरे आज सिंधुदुर्गात; नाणार प्रकल्पग्रस्तांची घेणार भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सिंधुदुर्गात येणार आहेत.  दोन दिवसांच्या दौऱ्यात ते कोकणातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेतील. यावेळी राज ठाकरे तिन्ही मतदारसंघाचा आढावा घेणार असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील.  त्यांच्यासोबत पक्ष बांधणीवर चर्चा करतील. दरम्यान राज ठाकरे या दौऱ्यात नाणार तसंच इतर प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ठोस निर्णय घेतील असंही सांगितलं जातंय. त्यामुळे जनतेलाही या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live