राज ठाकरे साधणार  इच्छुक उमेदवारांसोबत संवाद 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याचे उद्या (ता. ३०) आयोजन करण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात घोषणा करणार आहेत.

मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्‍लबमध्ये सोमवारी मनसेचा मेळावा होणार असून, या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे हे इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या नेत्याने दिली.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज यांनी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात राज यांनी दहा सभांमधून भूमिका घेतली होती. त्या वेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्‍याने खळबळ उडवून दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज काय भूमिका घेणार, ते मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत मनसे शंभरच्या आसपास जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत राज यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. राज हे सोमवारच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी आग्रही भूमिका राज यांनी घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, नाही अशी चर्चा होती. मात्र, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून राज यांनी त्यांचा निर्णय बदलला असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात सोमवारच्या मेळाव्यात राज हे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

स्वबळावर लढणार?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला सोबत घेतील, असा अंदाज व्यक्‍त केला जात होता. मात्र, राज यांचा आघाडीत समावेश करण्याचा मुद्दा मागे पडला आहे. त्यामुळे राज यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शविला, नाहीतर माझी काही हरकत नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भातही राज हे भाष्य करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Raj Thackeray will be announcing to contest the assembly elections

संबंधित बातम्या

Saam TV Live