राज ठाकरे मोंदीना लिहितात....पत्रास कारण की...

Raj Thackeray letter to Pm Narendra Modi
Raj Thackeray letter to Pm Narendra Modi

मुंबई:  कोरोना काय राज्यात कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. वाढणारी अतोनात रुग्णसंख्या आणि त्यासाठी लसीचा होत असलेला तुडवडा याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. Raj Thackerays direct letter to PM Modi regarding Corona measures

देशातील कोरोना Corona ची सुरुवात महाराष्ट्रात Maharashtra रुग्ण सापडून झाली होती. तेव्हा पासून हा एकदा मोजल्यास सर्वात जास्त मृत्यूआणि रुग्ण दुर्दैवाने त्यात महाराष्ट्र्र पुढे आहे. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती कोरोना बाबत खूप वाईट आहे. कोरोनाचा कहर सर्वात जास्त इथे सुरु आहे असं राज ठाकरेंनी पत्रात सांगितलं आहे.

या पत्राद्वारे त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणासाठी लसींची कमी पडत असलेली संख्या या ठळक मुद्यांवर मोदींचे लक्ष वेधले आहे. तसेच या पत्रातून ठाकरेंनी काही मागण्या देखील केल्या आहेत.
पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलंय की, कोरोना आणि लोक डाऊन यामुळे महाराष्ट्राचे फार नुकसान झाले आहे. सर्वात आधी रुग्ण महाराष्ट्र मधेच सापडले होते. यांनतर त्यांच्या एकदा वाढतच गेला.

राज ठाकरेंनी मोदींना केलेला प्रश्न
यामुळे देशाचे आर्थिक, सामाजिक नुकसान झाले आणि त्याचे परिणाम आपण अजूनही अनुभवत आहोत. आता ही नवीन लाट अली आहे ती रोहकण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे, हे आता महाराष्ट्रला परवडणार नाही. आणि हयामुळे परिस्थिती कायमची सुधारणार देखील नाही. हे कायमचे उपाय देखील नव्हेत. जर तुम्हाला पुरेशा लसी जर मिळताच नसतील तर दुसरा पर्याय तरी काय उरला ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

सर्वांसाठी लसीकरण:
तसेच वेगाने अंगावर येणाऱ्या कोरोना वर मात करायची असेल तर तर १०० टक्के लसीकरण करण्याची महाराष्ट्रने रणनीती करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रत सरसकट लसीकरण करणे असे ध्येय ठेवून लवकरात लवकर ह्या प्रक्रियेसाठी पावले उचलने गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले आहे. कमी कालावधीत हि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढ्या लसी केंद्राने राज्याला पुरवून आम्हाला साथ दयावी असे राज ठाकरेंचे म्हणणे आहे. Raj Thackerays direct letter to PM Modi regarding Corona measures

केंद्र सरकारकडे केलेल्या ५ मागण्या :
१) स्वतंत्रपणे महाराष्ट्र राज्याला लस खरेदी करू द्या,. 
२) खासगी सशांना देखील राज्यात लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी. 
३) लसींचा पुरवठा लोकांपर्यंत वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रतल्या इतर संस्थांना लस उत्पादन करू द्यावे . 
४) सिरम ला योग्य नियमन करून मुक्तपणे लस विक्रीची परवानगी द्यावी. 
५) कोविड रोगाचा उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे जसे कि,  रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक देण्यात यावी. 

साथीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक राज्याला तेथील स्थानिक परिस्थिती बघून योग्य ते धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्याचा विषय हा राज्यांचा आहे त्यामुळे यासाठी केंद्राने राज्यांना परिस्थिती नियंत्रणासाठी मदत करावी आणि प्रोत्साहन द्यावे आणि तुमच्या चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे असा विश्वास पत्राद्वारे राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.  

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com