परप्रांतियांबद्दल राज ठाकरेंचा राज्य सरकारला 'हा' सल्ला, मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती सर्वपक्षीय बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मे 2020

गावी परतलेल्या परप्रांतीयांची तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात परत घेऊ नका अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.

राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक काहीच वेळापूर्वी पार पडली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेही उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरेंनी सरकारला अनेक सल्ले दिले..कोरोनाचा विळखा ढिला करण्यासाठी अनेक सूचना यावेळी कऱण्यात आल्या..तासभर ही बैठक सुरु होती..यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले..आणि सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्या.

दरम्यान, गावी परतलेल्या परप्रांतीयांची तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात परत घेऊ नका अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. तसच परप्रांतीय कामगारांऐवजी मराठी तरूणांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करू द्या, असंही राज ठाकरेंनी म्हंटलंय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी लहान दवाखान्यांची गरजही व्यक्त केली. याशिवाय शाळांबाबतचा निर्णय, शेतकरी कर्जफेड याबद्दलही सरकारकडे विचारणा केली. लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? याबाबत 10 ते 15 दिवस आधी लोकांना सांगायला हवं असंही राज ठाकरेंनी म्हंटलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफची दुसरी तुकडी लावणं आवश्यक आहे. असंही राज ठाकरेंनी म्हंटलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live