आई मृत्यूशी झुंज देतेय, मुलगा महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी झटतोय! लढवय्याला सलाम

ब्युरो रिपोर्ट
गुरुवार, 19 मार्च 2020

आई दवाखान्यात दाखल असताना राजेश टोपे मात्र महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

कल्पना करा तुमच्या घरातली महत्त्वाची व्यक्ती असणारी तुमची आई रुग्णालयात दाखल आहे. आयसीयूमध्ये आहे. मृत्युशी झुंजतेय. अशावेळी तुम्ही तुमच्या आईला वेळ द्याल की तुम्ही तुमचं काम करण्याला आधी प्राधान्य द्याल? हा प्रश्न विचारल्यानंतर भावनांचा कल्लोळ मनात तयार होऊ शकतो. मात्र महाराष्ट्राच्या लढवय्या सुपुत्रानं आपल्या मनाला आणि मेंदूला शांत ठेवत मार्ग काढण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. 

बातमी आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपेंच्या कर्तव्यतत्परतेची. आई दवाखान्यात दाखल असताना राजेश टोपे मात्र महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

 

TWEET - 

 

 

 

महाराष्ट्रात कोरोना घुसल्यापासून राजेश टोपे माणसाने रात्रंदिन एक केला आहे.  टोपे यांनी कोरोनाबाबत महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवलंय. तेही स्वत:ची आई रुग्णालयात दाखल असताना. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाबाई या वृद्धत्वामुळे गेल्या 20 दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र राजेश टोपे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरतायत. 

शक्य असेल तेव्हा सकाळी रुग्णालयात जाऊन दहा मिनिटं आईची भेट घेऊन, हा लढवय्या नेता पुन्हा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरतोय. रुग्णालयांतील व्यवस्थेची पाहणी असो,  डॉक्टरांशी चर्चा, प्रशासनासोबत बैठका असो... राजेश टोपे नावाचा हा लढवय्या 16 ते 18 तास जनतेसाठी झटतोय.

 

TWEET - 

 

 

 

राजेश टोपेसाहेब, स्वत:ची आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राच्या सेवेत अहोरात्र  झोकून देण्याचं तुमचं योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही... तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या होतील अशीच प्रार्थना महाराष्ट्र करतोय... मात्र तुम्हीही कोरोनाशी लढण्यासाठी ज्या कर्तव्यभावनेने झटताय, तेही महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आईचा दवाखान्यातला लढा आणि तुमचा कोरोनाविरोधातला लढा नक्कीच यशस्वी होईल... कारण तुमच्या मातेश्री महाराष्ट्राच्याही मातोश्री आहेत... आणि तुम्हीही जीवाची बाजी लावून यशश्री खेचून आणणाऱ्या महाराष्ट्राचे लढवय्ये सुपुत्र आहात.

 

हेही वाचा - तुम्ही घरात धान्य साठवून ठेवताय का? मग हे महत्त्वाचंय

पाहा व्हिडीओ

 

raje tope mother serious maharashta illness health minister emotional story marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live