15 लाख रुपये लाटल्या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक  

rajendra landge
rajendra landge

पुणे - पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पर रित्या विकून तब्बल 15 लाख रुपये लाटल्या प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांला BJP अटक arreste करण्यात आली आहे.  Rajendra Landage arrested for embezzling Rs 15 lakh

राजेंद्र लांडगे Rajendra Landage अस अटक करण्यात आलेल्या विद्यमान नगरसेवकांच नाव आहे. पिंपरी - चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाचे सहाय्यक अभियंता एस.एस. भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारी वरून राजेंद्र लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. 

आरोपी नगरसेवक लांडगे प्राधिकरणाच्या सर्व्हे नंबर २२ मधील ९३६ चौरस फूट जागा स्वतःच्या मालकीची नसतांना खोटे नोटराईज कागदपत्रे बनवून ती जागा मनोज शर्मा आणि रविकांत ठाकूर नामक व्यक्तीला विकून त्यांच्याकडून १५ लाख ८० हजारात विक्री केल्याचं पोलिस तापसात उघडकीस आले आहे.  Rajendra Landage arrested for embezzling Rs 15 lakh

आपण घेत असलेली जमीन राजेंद्र लांडगे यांची नसून प्राधिकरणाची मालमत्ता आहे. हे माहीत असतांना देखील ती विकत घेऊन त्यावर बेकायदेशीररित्या बांधकाम उभारल्या प्रकरणी जमीन विकत घेणाऱ्या मनोज महेंद्र शर्मा आणि रविकांत सुरेंद्र ठाकूर यांच्या विरुद्ध देखिल फसवूणुकीचा गुन्हा दाखल करून लांडगे आणि शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आरोपी असलेला रविकांत ठाकूर यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com