राज्यात दोन पद्धतीने होणार रेमडिसिवीरचा पुरवठा

Rajesh Tope on Distribution of Remdisivir
Rajesh Tope on Distribution of Remdisivir

जालना: राज्यात सध्या रेमडीसीवीरचा इंजेक्शन Remedicivir injection तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. आणि त्याचा काळाबाजार Black Market केल्याचा घटना ही दिसून येत आहेत. त्यामुळे रेमडीसीवीरचं वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी आरोग्यमंत्री माहिती राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे.  Rajesh Tope said Remedicivir injection supply in two ways to stop the black market

जालन्यात आज टोपे यांच्या हस्ते खाजगी कोविड Covid रुग्णालयाच्या डॉक्टरांना १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून टेंडर पद्धतीनं हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल.  तर प्रत्येक जिल्ह्यात एक स्टाॅकिस्ट असणार आणि त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार असून जिल्हाधिकारी Collector खाजगी रुग्णालयाची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील, या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे. यातून खाजगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्या प्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.  मात्र कोणतंही राज्य या संदर्भात मदत करायला तयार नसून आपल्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल, हाच मार्ग असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी CM सुरु केलेल्या ब्रेक द चेन Break the Chain  संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावं असंही टोपे यावेळी म्हणाले. Rajesh Tope said Remedicivir injection supply in two ways to stop the black market

सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या 15 दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन Oxygen शोषून घेणारा प्लांट उभारत असून यात यश मिळालं तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल असंही टोपे म्हणाले.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com