शटडाऊनमुळे फटका बसलेल्या फिल्म कामगारांना रजनीकांत यांनी दान केले 50 लाख

श्रेयस सावंत
मंगळवार, 24 मार्च 2020

देशातली 30 हून अधिक राज्यात सध्या संचारबंदी आहे, 550हून अधिक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका दैनंदिन कामकाजावर पोट भरणा-या प्रत्येकाला बसणारच आहे.

मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शटडाऊनमुळे काम बंद झालेल्या अनेक चित्रपट क्षेत्रातील लोकांना दिलासा मिळणार आहे. रजनीकांत यांनी 50 लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. साऊथ इंडियन युनिअन वर्करच्या चित्रपट कामगार संघटनेला मदत करण्यासाठी, हे पैसे दान देण्यात येणार आहे. कुणाही गरीबाचं नुकसान होऊ नये, यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांनी 50 रुपये दान केले आहेत. 

 

देशातली 30 हून अधिक राज्यात सध्या संचारबंदी आहे, 550हून अधिक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका दैनंदिन कामकाजावर पोट भरणा-या प्रत्येकाला बसणारच आहे. मात्र अशात रजनीकांत यांनी घेतलेल्या निर्णयमामुळे थोड्या प्रमाणात का होईना, काही कामगारांना मदत मिळणार आहे. 

 

रजनीकांत यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय - 

 

 

कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातलंय. या महामारीच्या काळात सकाळच्या वतीने 25 लाखांचा निधी देऊन फंडाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक कसोटीच्या क्षमी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून समाजासाठी आपण सढळ हाताने मदत करताच. यावेळी आपण अशीच मदत करावी असं आवाहन आम्ही 'सकाळ माध्यम समुहा'च्यावतीने 'साम टीव्ही'च्या माध्यमातून करतो आहोत. 

मदत करण्यासाठीची रक्कम तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या बँक अकाऊंटमध्ये तुम्ही ट्रान्सफर करा. HDFC बँकेच्या 57500000427822 या अकाऊंट नंबरवर ट्रान्सफर करावी. ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठीचा IFSC नंबर आहे, HDFC0000103. 

तर महामारीच्या या भयंकर परिस्थिती तुम्ही सढळ हाताने मदत करावं असं आव्हान आम्ही पुन्हा एकदा करतो आहोत. 

 

सर्वांनाच कोरोनामुळे घरी बसावं लागतंय. लोक घरात बसून कंटाळलेत. हाच कंटाळा दूर करण्यासाठी सकाळ घेऊन येत आहे एक सरप्राईझ म्हणजेच #AtHomeWithSakal कुटुंबातल्या प्रत्येकाचा कंटाळा घालविण्यासाठी एक मजेशीर सरप्राईझ येतंय.

यामध्ये महिलांसाठी ७ दिवसांचा फॅशन शो असणार आहे. यात रोजच्या थीमप्रमाणे ड्रेस परिधान करायचे आहेत. घरातच महिलांनी छोटासा रॅम्प वॉक करायचा आहे. त्याचा व्हिडिओ सकाळला टॅग करुन शेअर करायचा आहे. 

पुरुषांसाठी असणार आहे सूर्यनमस्कार चॅलेंज.. पुरुषांनी १० सूर्यनमस्कार करत त्याचा व्हिडिओ करायचा आहे. एखाद्या मित्राला टॅग करत चॅलेंज द्यायला आहे. सकाळला टॅग करत तो व्हिडिओ शेअर करायचा आहे. 

लहान मुलांनी कोणताही कलागुण सादर करुन त्याचा व्हिडिओ काढायचा आहे, सकाळला टॅग करुन तो व्हिडिओ शेअर करायचा आहे. 

अख्ख्या कुटुंबासाठीही एक स्पर्धा आहे. सर्व कुटुंबीय मिळून एक गाणं बनवतील आणि त्याचा व्हिडिओ सकाळला टॅग करुन शेअर करायचा आहे. याव्यतिरिक्त असणार आहे हूक अप स्टेप चॅलेंज.. 

सर्व कुटुंबीय मिळून अथवा वेगवेगळे एखाद्या आवडत्या गाण्याची हुक स्टेप करतील.. त्याचा विडिओ बनवतील आणि तो व्हिडिओ सकाळला टॅग करून शेअर करतील.

 

 

Rajinikanth donated 50 lakhs to Film Employees of South India Union workers 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live