रामदेव बाबांच्या 'पतंजली' वरच कोरोनाचा अॅटॅक!

Ramdev Baba
Ramdev Baba

नवी दिल्ली : अॅलोपथी Allopathy हे बकवास आणि दिवाळं काढणारं शास्त्र आहे हे सांगणाऱ्या योग गुरु रामदेव बाबांच्या Ravdev Baba पतंजली Patanjali संस्थेलाच मोठा धक्का बसला आहे. पतंजलीच्या डेअरी विभागाचे प्रमुख सुनील बन्सल यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन Dr. Harshwardhan यांनी खडसावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागं घेतलं आहे. Ramdev Baba Patanjali Senior Employee Died due to corona

रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यानंतर खळबळ माजली होती. रामदेव बाबा चुकीची माहिती पसरवून कोरोना वाढवत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने IMA केला होता. काही महिन्यांपूर्वी रामदेव बाबांच्या पतंजली ने निर्माण केलेल्या कोरोनिल औषधावरुनही वाद झाला होता. हे औषध कोरोना बरा करते असा दावा त्यावेळी रामदेव बाबांनी केला होता. 

रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आयएमएनं रामदेव बाबांना कायदेशीर नोटिस बजावली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही रामदेव बाबांना यावरुन खडसावले. त्यानंतर रामदेवबाबांनी एक पत्रक काढून आपले वक्तव्य मागं घेतलं. त्यातच आता बन्सल यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे अॅलोपथीवर टिका करणाऱ्या रामदेव बाबांना हा मोठा धक्का आहे. Ramdev Baba Patanjali Senior Employee Died due to corona

सुनील बन्सल यांचा मृत्यू १९ मे रोजीच झाला होता. 'द प्रिंट'ने आता सुनील यांच्या निकटवर्तीयाचा हवाला देत हे धक्कादायक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तानुसार सुनील यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. नंतर त्यांच्या मेंदूतही रक्तस्त्राव झाला. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

रामदेव बाबा कोरोनाची साथ आल्यापासून काही ना काही मुद्यांवर वादात राहिले. आपल्या कोरोनिल औषधाच्या निमित्ताने त्यांनी डाॅक्टरांवर टिका केली होती. डाॅक्टर हे खुनी असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. Ramdev Baba Patanjali Senior Employee Died due to corona

आता पुन्हा एकदा अॅलोपथीवर टिका करुन रामदेव बाबांनी वाद ओढवून घेतला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी त्यांना चांगलंच खडसावलं. अॅलोपॅथीशी संबंधित डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या मेहनतीनं कोरोना रुग्णांचे जीव वाचवत आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे कोरोनाशी सुरु असलेला लढा कमजोर होऊ शकतो. आपण आपले विधान मागे घ्याल, अशी अपेक्षा आहे अशा भाषेत डाॅ. हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहिलं होतं. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com