रामदेवबाबांची अडचण वाढली; आयएमएचा १००० कोटींच्या दाव्याचा इशारा

IMA Ramdev baba.jpg
IMA Ramdev baba.jpg

नवी दिल्ली : अ‍ॅलोपॅथीसंदर्भात Allopathy बाबा रामदेव Baba Ramdev  यांनी 25 प्रश्न जारी केल्यानंतर उत्तराखंडमधील Uttrakhand  इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA)  त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बाबा रामदेव यांना अ‍ॅलोपॅथीचा 'अ' देखील माहित नाही. आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत, परंतु  त्यांनी पहिल्यांदा त्यांची पात्रता सांगावी. रामदेव बाबा यांनी 15 दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात 1000 कोटी रुपयांचा  दावा  मानहानीचा  दावा दाखल केला जाईल, असा इशारा आयएमए' ने दिला आहे. (Ramdev Baba's difficulty increased; IMA warns of Rs 1,000 crore claim) 

उत्तराखंडचे आयएमए'चे   सचिव डॉ. अजय खन्ना यांनी याबाबत माहिती दिली आहे.  मी  बाबा रामदेव यांच्याशी समोरासमोर बसून  त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे.  अ‍ॅलोपॅथी बद्दल बाबा रामदेव यांना फारशी माहितीही नाही. असे असूनही, ते अ‍ॅलोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांविरोधात बेताल  वक्तव्य करीत असल्याचे डॉ. अजय खन्ना यांनी यांनी म्हटले आहे.  राम देवबाबांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे  रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या डॉक्टरांचे मनोबल कमी झाले आहे. बाबा रामदेव नेहमीच रोग आणि त्यांच्या उपचारांबद्दल अवैज्ञानिक दावे करत आले आहेत. ते कर्करोग बरा करण्याचा दावा करतात. जर असं असेल तर या शोधाबद्दल त्याला नोबेल पारितोषिक मिळायला हवं. असा टोलाही यावेळी डॉ. अजय खन्ना यांनी लगावला आहे.

आपली औषधे विकली जाण्यासाठी रामदेव बाबा सातत्याने खोटे बोलत आहेत. आमच्या  रुग्णालयांमध्ये त्यांनी आपल्या औषधांची ट्रायल केल्याचा दावा केला होता, त्यावर आम्ही त्यांना विचारल की, ज्या रुग्णालयांमध्ये  तुम्ही ट्रायल केली आहेत त्यांची नावे सांगा, मात्र ते सांगू शकले नाहीत.  कारण त्यांनी कोणत्याही औषधांची  चाचणी केली नव्हती. कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या डॉक्टरांविरूद्ध अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल  देशातील नागरिकही बाबांवरही संतापले आहेत. त्यांची औषधे विक्री होण्यासाठी टीव्हीवर लसीकरणामुळे  दुष्परिणाम होत असलेल्या जाहिराती करत आहेत.  त्यामुळे जर केंद्र  सरकारने  रामदेव बाबांवर  साथीचा रोग अधिनियमंतर्गत  कारवाई केली नाही तर आयएमए हरिद्वारमध्ये त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करेल. असा निर्वाणीचा इशारा डॉ. अजय खन्ना यांनी दिला आहे.

आम्ही बाबांच्या कार्यपद्धतीबाबत कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांच्या उत्पादनांबद्दल कधीही काहीही बोलले नाही.  त्यामुळे ते  त्यांच्या पद्धती आणि औषधांबद्दल बोलले तर ते अधिक चांगले होईल. रामदेवबाबा केवळ आपली  उत्पादने आणि औषधे विकली जावीत म्हणून असा वाद निर्माण करत आहेत, असा आरोपही यावेळी अजय खन्ना यांनी केला आहे.

दरम्यान, आयएमएने पतंजली संस्थापक रामदेव यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी डॉक्टरांनी रामदेवबाबा आणि पतंजलीचा निषेधही केला आहे. सोशल मीडियावरही रामदेवबाबांच्या विरोधात एक मोहीम सुरू होती. यात सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रामदेव बाबांच्या अटकेची मागणी करणाऱ्या  हजारो पोस्ट लिहिल्या होत्या.

त्यानंतर या सर्व घटना क्रमानंतर बाबा रामदेव यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर रामदेव यांच्यावरही खूप टीका होत आहे. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या अटकेच्या मागणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ‘अटक तर ते माझ्या वडिलांनाही करू शकत नाही,’ असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  आता या प्रतिक्रियेवर आयएमए काय पाऊल उचलणार हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Anuradha Dhawade 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com