हाथरसमधील पिडितेचा 8 महिन्यांआधीच झाला होता साखरपुडा! मात्र विवाहाऐवजी क्रूर प्रसंगानं घेतला जीव

साम टीव्ही
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोरोना नसता तर तिला 5  महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे मोठे काका रोशनलाल वाल्मिकी व चुलतभाऊ बलबीर वाल्मिकी यांनी दिली आहे. दिल्लीतील एका तरुणाशी तिचा विवाह ठरला होता. 

हाथरसमधील पिडितेबद्दल दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता एक नवीन बाब समोर आली आहे. ती म्हणजे त्या पिडितेचा 8 महिन्यांआधीच साखरपडा झाला होता. काही दिवसांआधीच ती बोहल्यावर चढली असती मात्र त्याआधीच तीचा घात झाला. अशी माहिती पिडितेच्या काकांनी दिलीय. तिचा ८ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता.

मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5  महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे मोठे काका रोशनलाल वाल्मिकी व चुलतभाऊ बलबीर वाल्मिकी यांनी दिली आहे. दिल्लीतील एका तरुणाशी तिचा विवाह ठरला होता. 

 हाथरस पथरी गावात वाल्मिकी परिवारातील केवळ चारच घरे आहेत. वाल्मिकी यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. पीडिता ही सर्वात लहान होती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला होता. मे मध्ये लग्न होणार होते; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने ती बोहल्यावर चढू शकली नाही आणि आता तिला पाशवी अत्याचारामुळे जीव गमवावा लागल्याची खंत रोशनलाल यांनी व्यक्त केली. योगी सरकारवर आपला विश्‍वास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रोशनलाल वाल्मिकी हे काही वर्षांंपासून उल्हास नगरमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी यांसंदर्भात माहिती दिली. दरम्यान, पिडितेवर याआधी सुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी तीने आरडाओरडा केला आणि त्यामुळे तिचा आवाज तिच्या आईपर्यंत गेला व ती बचावली. मात्र दुसऱ्या वेळी आरोपींनी तिला शेतात गाठलं, तिचं तोंड दाबून ठेवल्याने प्रतिकाराचा आवाज आला नाही. आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. दरम्यान, हे सांगताना बलबीर याचे डोळे पाणावले होते.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live