विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या नाकात आता रॅपिड टेस्टच्या स्वॅबची काडी

भूषण अहिरे
बुधवार, 19 मे 2021

प्रशासनातर्फे वारंवार सूचना देऊन देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचं आढळून येत. असल्यामुळे अखेर धुळे महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने एकत्रित येत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

धुळे : प्रशासनातर्फे वारंवार सूचना देऊन देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचं आढळून येत असल्यामुळे अखेर धुळे महानगरपालिका प्रशासन Dhule Municipal Corporation व पोलीस Dhule Police प्रशासनाने एकत्रित येत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट Rapid Test करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. यादरम्यान अहवाल पॉझिटिव्ह येणार्‍या नागरिकांना तात्काळ कोविड सेंटरमध्ये Covid Center उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. Rapid tests are being done on citizens who go out for no reason

धुळे जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा Corona कहर बघावयास मिळत असून आरोग्य यंत्रणेतर्फे कोरोनाची तिसरी लाट Third Wave येणार असल्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनातर्फे केले जात आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाकडे धुळेकरांचे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे.

हे देखील पहा -

नागरिक विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावरती फिरत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत धुळ्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळेच या बेजबाबदार धुळेकरांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तसेच धुळे महानगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. Rapid tests are being done on citizens who go out for no reason

महावितरणच्या कल्याण परिमंडळाला चक्रीवादळाचा मोठा फटका, सुमारे तीन कोटींचे नुकसान

 

ज्या नागरिकांची तपासणी ही पॉझिटिव्ह Positive येत आहे अशा नागरिकांना तात्काळ कोविडसेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या कारवाईमुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक दिनकर पिंगळे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live