दुर्मिळ रेती सर्पाला सर्पमित्रांनी दिले जीवनदान

भूषण अहिरे
शनिवार, 29 मे 2021

तब्बल अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांना हा सर्प पकडण्यास यश आले आहे

धुळे - धुळे शहरातील गंगाधामनगर परिसरातील रहिवाशींना शतपावली करीत असतांना एक सर्प Snake  घरालगत असलेल्या पडक्या ठिकाणी बिळाच्या दिशेने जात असतांना दिसला तेथील परिसरातील रहिवाशींनी याबाबतची माहिती सर्पमित्रांना दिली. त्यानंतर ही सर्पमित्र माहिती दिलेल्या ठिकाणी दाखल झाले. (Rare sand serpent was given life by serpent friends)

तब्बल अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांना हा सर्प पकडण्यास यश आले आहे. डोंगराळ व खडकाळ भागामध्ये आढळला जाणारा हा रेती सर्प मानवी वस्ती मध्ये आढळल्याने सर्पमित्रांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

अत्यंत चपळ परंतु शांत स्वभावाचा असून हा सर्प अल्प विषारी असल्याचे सर्पमित्रांनी ग्रामस्थांना माहिती देताना स्पष्ट केले असून सर्पमित्रांनी या दुर्मिळ सर्पास त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देत त्यास जीवन दान दिले आहे.

Edited by - Puja Bonkile

 

हे देखिल पहा - 


संबंधित बातम्या

Saam TV Live