दिग्रस दारव्हा रस्त्यासाठी नागरिकांचे रस्तारोको आंदोलन

प्रसाद नायगावकर
शुक्रवार, 11 जून 2021

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित  प्रलंबित आहे. या कामाच्या कंपनीला व कंत्राटदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, या मागणीला घेऊन दिग्रस येथे मानोरा चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित  प्रलंबित आहे. या कामाच्या कंपनीला व कंत्राटदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, या मागणीला घेऊन दिग्रस येथे मानोरा चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. Rastaroko movement for Digras Darwha road

दिग्रस दारव्हा मार्ग ठरलेल्या कालावधीत बांधायचाच नव्हता तर तो उखडून ठेवला का ? एक दोन महिने नव्हे तर पाच वर्षात रस्ता पुर्ण का होत नाही ? हे मुख्य प्रश्न दिग्रसकरांचे आहे. याच मार्गावरील चिंचोली Chincholi ते शहरातील मानोरा चौकात पुर्ण रस्ता गेल्या एक वर्षांपासून उखडून ठेवला आहे. दोन दिवसांच्या पावसाने संपूर्ण परिसरात पाणी साचले आहे. 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर दगडफेक

पाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रस्त्यावर पाणी साचल्याने आता जायचे कोठून या अडचणींने लोक वैतागून गेले आहेत. अखेर आम्ही दिग्रसकर Digras या नावाखाली सर्व एकत्रीत येऊन रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. 

हे देखील पहा- 

या प्रसंगी आम्ही दिग्रसकर म्हणून विविध पक्षाचे, संघटणेचे पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक रहिवासी असे शेकडो लोक रस्त्यासाठी रस्त्यावर उतरली होती. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर  हे आंदोलन मागे घेण्यात आले .

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live