रेशनिंग दुकानं, चेकनाक्यावर शिक्षकांची नियुक्ती, मात्र शिक्षकांची होतेय गैरसोय

साम टीव्ही
सोमवार, 11 मे 2020
  • रेशनिंग दुकानं, चेकनाक्यावर शिक्षकांची नियुक्ती
  • कोरोना आपत्तीकाळात माध्यमिक-प्राथमिक शिक्षकांवर भार
  • मास्कसह कोणत्याच सुविधा शिक्षकांना उपलब्ध नाहीत

कोरोना आपत्तीच्या काळात माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात. पण या जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षकांची गैरसोय होतेय.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती काळात जिल्हा प्रशासनानं माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांना काही जबाबदाऱ्या दिल्यात. चेक नाक्यावर, रेशनिंग दुकानांमध्ये आणि ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्याचं काम शिक्षकांवर सोपवलं गेलंय. मात्र काम करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांकडून होतेय. मास्क, सॅनिटायझर किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही वस्तू शिक्षकांना मिळत नसल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात येतंय.

प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसह मुख्याध्यपकांनाही सेवेत सामील करुन घेण्यात आलंय. घरोघरी जाऊन नागरिकांचं तर कधी चेकनाक्यावर उभं राहून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांचं सर्वेक्षण या शिक्षकांना करावं लागतंय. आपलं काम हे सारे शिक्षक चोख बजावतायंत. पण सुरक्षेसाठी कोणत्याच सुविधा शिक्षकांना मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी केलीय. हे नक्कीच शिक्षकांच्या आरोग्यावर बेतू शकतं, त्यामुळे शासनानं याप्रकऱणी तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live