रत्नागिरीत एप्रिल महीन्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण...

अमोल कलये
सोमवार, 3 मे 2021

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हाप्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र दिवसाला जवळपास पाचशेच्या वर कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात सापडत आहेत.

रत्नागिरी: रत्नागिरीत Ratnagiri कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्हाप्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र दिवसाला जवळपास पाचशेच्या वर कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात सापडत आहेत. Ratnagiri District Corona update 

गेल्या वर्षभरात रत्नागिरीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल महीना हा रत्नागिरीकरांना चिंतेत भर टाकणारा ठरला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रत्नागिरीत ११०२९ रुग्ण सापडले आहेत. तर एप्रिल २०२१ या एका महीन्यात केवळ ११२५४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यापैकी 280 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

रत्नागिरीतील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या आता २२२८३ इतकी झाली आहे. तर ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४६६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live