रुग्णवाहिका घेऊन रविकांत तुपकर थेट धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात!

संजय जाधव
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

तब्बल पाच तास फिरूनही औषधोपचाराची सोय होत नसल्याने आईला गमावण्याची वेळ मुलांवर येऊन ठेपली. दरम्यान, या गंभीर बाबीची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी कक्षासमोर नेऊन आपला रुद्रावतार दाखविला

बुलडाणा : तब्बल पाच तास फिरूनही औषधोपचाराची सोय होत नसल्याने आईला गमावण्याची वेळ मुलांवर येऊन ठेपली. दरम्यान, या गंभीर बाबीची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर Ravikant Tukkar यांनी रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी कक्षासमोर नेऊन आपला रुद्रावतार दाखविला. Ravikant Tupkar Drove ambulance to Buldana District Collector office

एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची कोविडमुळे Covid 19 प्रकृती अत्यवस्थ झाली. ग्रामीण भागातून आलेल्या महिलेस शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयात जागा नसल्याने भरती करवून घेण्यात आले नाही. आईचे प्राण वाचावेत म्हणून मुला, मुलीने खासगी दवाखान्यांच्या Privat Hospital डॉक्टरांकडे विनवणी केली. मात्र, सर्व रुग्णालये रुग्णांनी भरलेली, त्यातच ऑक्सिजनची Oxygen व्यवस्था नसल्याने तेथेही नाकारण्यात आले.

रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थांबवा, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी District Collector तातडीने महिलेला स्त्री रुग्णालयामध्ये भरती करवून घेतले. रविकांत तुपकरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बेड आणि ऑक्सिजन मिळाल्याने अखेरच्या घटका मोजत असलेल्या 'त्या' महिलेचे प्राण वाचले

मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजारनजीक असलेल्या आणि मराठवाड्याच्या सीमेवरील  मोलखेडा येथील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने मुलगा गोपाल व मुलीने एका रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर लावून आईला बुलडाणा येथे सकाळी ११ वाजता आणले. शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्याने त्यांना परत फिरावे लागले. Ravikant Tupkar Drove ambulance to Buldana District Collector office

आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानांही आईचा जीव वाचविण्याकरिता दोघा बहीण-भावांनी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. शहरातील सुमारे दहा दवाखाने फिरल्यानंतरही त्यांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठविण्यात आले. पाच तास फिरल्यानंतर मुले मेटाकुटीस आली. तेवढ्यात हतबल झालेल्या मुलास कुणीतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा मोबाइल नंबर दिला.

जिल्हाधिकारी District Collector एस. रामामूर्ती व्हीसीमध्ये बसलेले होते. काही वेळातच प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भूषण अहिरे बाहेर आले. यावेळी तुपकर यांनी संताप व्यक्त केला. सरकारी दवाखान्यातून रुग्णांना असे मरणाच्या वाटेवर का सोडता, खासगीतही जागा नसल्याने रुग्णांवर उपचार कसे होणार? असा सवाल तुपकर यांनी केला. तुपकर यांचे उग्र रुप पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा हलविली. अखेर महिलेवर उपचार सुरू झाले. Ravikant Tupkar Drove ambulance to Buldana District Collector office
   
प्राणवायू ८० वर

वृद्ध महिलेच्या ऑक्सिजनची Oxygen लेवल ८० वर आली होती. त्यामुळे तिला ऑक्सिजनची नितांत गरज होती. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र, कोणत्याच दवाखान्यात भरती केले जात नव्हते, त्यातच ऑक्सिजन सिलेंडरही संपत आलेला होता. सकाळी ११ ते सायंकाळी ४ अशा पाच तासांपर्यंत हे कुटुंबीय फिरत होते. शेवटच्या क्षणी रविकांत तुपकर या कुटुंबाला देवासारखे भेटण्याची प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live