रविकांत तुपकरांच्या पुढाकारने सुरु झाले 'किन्होळा पॅटर्न' कोविड सेंटर!

संजय जाधव
सोमवार, 10 मे 2021

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उभा राहिलाय. आता बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभरात हा किन्होळा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतलाय.

बुलडाणा : 'गाव करी, ते राव न करी' अशी एक म्हण आपल्या मराठीत आहेय. याचाच प्रत्यय दिलाय बुलडाणा Buldana जिल्ह्यातील किन्होळा गाववासियांनी. या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून गावातच ५० बेडचं सुसज्ज असं कोविड आयसोलेशन Covid Isolation Centre सेंटर उभारलंय. हे विदर्भातील पहीले लोकवर्गणीतून  Crowd Funding उभारलेले कोविड सेंटर होय...Ravikant Tupkar erected Covid Center in Buldana with Public Funding

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उभा राहिलाय. आता बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभरात हा किन्होळा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला.

हे देखिल पहा - 

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या फेऱ्यात किन्होळा गाव पार सैरभैर होऊन गेलं... गावात कोरोना रूग्णांची संख्या शेकडोवर गेल्यानं भीतीचं वातावरण होतं. किन्होळा गावाच्या या परिस्थितीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना याची माहिती मिळाली. त्यांनी किन्होळा गावाच्या परिस्थितीवर स्वत:च उत्तर शोधण्याचं ठरवलं. अन येथूनच सुरू झाली सध्याच्या कोरोनाला उत्तर देणाऱ्या एका आदर्श उपक्रमाची...Ravikant Tupkar erected Covid Center in Buldana with Public Funding

कोरोना लसीकरणा सुसूत्रता आणण्यासाठी ही शोधली शक्कल

त्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेत गावात कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याचा विचार बोलून दाखविला. अन यासाठी शासनाची व नेत्यांची मदत न घेता गावकऱ्यांना लोकवर्गणीसाठी आवाहन केलं. गावकऱ्यांनी गावाप्रतीच्या सामाजिक बांधिलकीतून लाखोंचं योगदान लोकवर्गणीतून जमा केलं. रविकांत तूपकरांनीही आपलं आर्थिक योगदान देत कृतीशील पुढाकाराचं उदाहरण घालून दिलं 

या कोविड केअर सेंटरचं व्यवस्थापन पाहण्याचं काम गावातील ५० स्वयंसेवक २४ तास करताहेत. कोविड सेंटर्सवरील सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी गावकऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्यात. गावातच आता कोरोनाचे उपचार होत असल्याने गावकऱ्यांचा त्रास वाचलाय. यामुळे रूग्ण गावाच्या या अनोख्या प्रयत्नामुळे भारावलेत.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live