आरबीआयचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आणखी 3 महिने EMI नाही...

सरकारनामा
शुक्रवार, 22 मे 2020
  • आरबीआयचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा
  • मोठा दिलासा! आणखी 3 महिने EMI नाही
  • रेपो रेटमध्ये कपात, रेपोरेट 4.40 वरुन 4%
  • कर्जाबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा आणखी 3 महिन्यांनी वाढवलीय. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. याआधीही 3 महिने EMI न भरण्याची सूट देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आलीय. रेपो रेटसह रिव्हर्स रेपोरेटमध्येही आरबीआयने कपात केलीय. रेपो रेटमध्ये पॉईन्ट चाळीस टक्क्यांची कपात करण्यात आलीय. त्यामुळे कर्ज स्वस्त होऊन व्याजदर कमी होणारंय.

4.40वरुन रेपोरेट आता 4 टक्के करण्यात आलाय. त्याचबरोबर जगभरात मंदीचं वातावरण राहणार असल्याचाही अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलाय. तर कृषी क्षेत्राबाबत त्यांनी सकारात्मक आणि आशादायी चित्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवलीय. बाजारातील मागणीत तब्बल 60 टक्क्याची घट झाली असल्यानं अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचं ते म्हणाले.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. घोषणा झाल्यानंतर एका तासात शेअर बाजार 400 अंकानी कोसळला.  तर निफ्टीचीही पडझड झाली आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला होतात. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात सुधार होत होता. मात्र आज पुन्हा शेअर बाजार गडगडलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live