पंतप्रधान मोदी स्वत: भ्रष्ट आहेत, आज हरवलंय, 2019 ला पण हरवू : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध आश्वासने दिली होती. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण केली नाहीत. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली वचनंही पूर्ण केली नाहीत. रोजगार, भ्रष्टाचार आणि शेतकरी या मुद्यांवरून नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. मात्र, पंतप्रधान मोदी स्वत: भ्रष्ट आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ''आज हरवलंय, 2019 ला पण हरवू'', असेही राहुल गांधी म्हणाले.

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले असून, भाजप पिछाडीवर आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केले. राहुल गांधी म्हणाले, विरोधीपक्षांची एकजूट आहे. ईव्हीएमवर फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात प्रश्न उठविले जात आहेत. यामध्ये चिप असल्याने गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. भाजपने शेतकऱ्यांना दिलेले वचनंही पूर्ण केली नाहीत. रोजगार, भ्रष्टाचार आणि शेतकरी यांसारख्या मुद्यांवरून मोदी सत्तेत आले. मात्र, त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''देशातील जनताच खरे शिक्षक आहे. भाजपचा पराभव करू पण भाजपमुक्त भारत करणार नाही. भाजपने केलेले काम आम्ही पुढे घेऊन जाऊ''. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live