वाचा | नक्षलवाद्यांकडून 4 वाहनांची जाळपोळ

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 20 मे 2020

राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाइंट आहे. याठिकाणी मंगळवारी रात्री वाळू वाहतूक करणा-या चार ट्रकला आग नक्षलवाद्यांनी आग लावली. यामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय.  तीन दिवसापूर्वीच भामरागड तालुक्यात नक्षल पोलिस चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर सावरगाव पोलिसांसह गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोलिंग वाढवली. त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून धुडगूस घालणाऱ्या नक्षलवाद्यांचाही शोध घेण्यात येत आहे. 

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असतानाच काल रात्री नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. गेल्या महिन्यात नक्षली नेता सृजनाक्का एका चकमकीदरम्यान पोलीसांकडून मारली गेली. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केलीय. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी उच्छाद मांडलाय. राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाइंट आहे. याठिकाणी मंगळवारी रात्री वाळू वाहतूक करणा-या चार ट्रकला आग नक्षलवाद्यांनी आग लावली. यामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय.  तीन दिवसापूर्वीच भामरागड तालुक्यात नक्षल पोलिस चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर सावरगाव पोलिसांसह गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोलिंग वाढवली. त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून धुडगूस घालणाऱ्या नक्षलवाद्यांचाही शोध घेण्यात येत आहे. 

बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पण बंद यशस्वी होण्यासाठी नक्षलवाद्यांनी काल रात्रीपासूनच जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. काल रात्री येथील राष्ट्रीय महामार्गावरील गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाँइटवर छत्तीसगडमधून आलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. सुदैवाने चालकाने ट्रकमधून पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला. मात्र यात ट्रकचालकाचे ९० लाखांचे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जहाल माओवादी सृजनाक्का मारल्या गेली होती. त्यामुळे नक्षलवादी हादरून गेले होते. या घटनेच्या निषेधार्थ या माओवाद्यांनी २० मे रोजी गडचिरोली बंदची हाक दिली होती. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात बंदचे पोस्टरही लावण्यात आले होते. 

WebTittle :: Read | 4 vehicles torched by Naxals


संबंधित बातम्या

Saam TV Live