वाचा | पंतप्रधान मोदींनी का राहायला सांगितलं अर्लट 

वाचा | पंतप्रधान मोदींनी का राहायला सांगितलं अर्लट 

नवी दिल्ली :  पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही. करोनामुळं होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपलं जे नुकसान झालं आहे त्याचं आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.”

करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही.”

करोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा आणि आपल्या आशा, या संकटाचा अनुभवही नाही आणि इलाजही, त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल, प्रत्येक वर्गाला कोरोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले. श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु, उद्योगही सुरु, म्हणजेच अर्थव्यवस्थेचा मोठा भाग खुला झाला, अशात आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असे मोदी म्हणाले.

करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी, जे नुकसान झालं त्याचं दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे. देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद असल्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
WebTittle :: Read | Alert why Prime Minister Modi asked to stay

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com