वाचा | ... आणि धारावीतले कोरोनाचे रूग्ण

mसाम टीव्ही न्यूज
गुरुवार, 28 मे 2020

शहरात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाचं कारण सर्वात मोठी झोपडपट्टी भाग धारावीला मानलं जातं आहे. याठिकाणी कोरोनाचे एकूण १ हजार ५४१ रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरात दाट लोकसंख्येमुळे सामाजिक अंतरांचे पालन आणि स्वच्छता यासारख्या अनेक आव्हानांचा सामना प्रशासनाला करावा लागत असे. धारावीसह आसपासचे परिसरही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

मुंबई : धारावीतील पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी आढळून आला. १५ एप्रिलपर्यंत येथे १०० कोरोनाग्रस्त आढळले. २७ एप्रिल ते १५ मे या कालावधीत जी उत्तर वॉर्डात ९५ रुग्ण आढळले, त्यातील बहुतेक झोपडपट्टीतील. आता हा सरासरी दर २५ वर आला आहे. प्रभागचे अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर म्हणाले, अधिकाधिक तपास हा त्यामागील मोठा घटक आहे. खासगी डॉक्टर आणि रुग्णालये देखील बीएमसीसह पुढे आली आणि त्यांनी खूप मदत केली. आम्ही झोपडपट्टी भागात साडेचार लाख लोकांची तपासणी केली. २४ खासगी डॉक्टरांनी डोअर टू डोर स्क्रीनिंग केले. त्यांनी ५० हजार लोकांची स्क्रिनिंग केली आणि एक पैसाही घेतला नाही.

शहरात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाचं कारण सर्वात मोठी झोपडपट्टी भाग धारावीला मानलं जातं आहे. याठिकाणी कोरोनाचे एकूण १ हजार ५४१ रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरात दाट लोकसंख्येमुळे सामाजिक अंतरांचे पालन आणि स्वच्छता यासारख्या अनेक आव्हानांचा सामना प्रशासनाला करावा लागत असे. धारावीसह आसपासचे परिसरही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र दिलासा देणारी बाब अशी की, आता धारावीतील कोरोना प्रकरणांमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. बुधवारी एका दिवसात किमान १८ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची दुप्पट वाढ आणि सरासरी वाढीचा दर देखील कमी झाला आहे.आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल हे दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीच्या तज्ज्ञ टीमसमवेत धारावी येथे होते. लॉकडाऊन संपण्यासाठी मुंबईला रेड झोनमधून बाहेर पडावे लागेल यात काही शंका नाही आणि त्यासाठी धारावीतील कोरोना प्रकरणांची संख्या स्थिर करावी लागेल असं त्यांनी सांगितले.
 

WebTittle :: Read | ... and corona patients from Dharavi


  


संबंधित बातम्या

Saam TV Live