वाचा | ....आणि मुंबईतला कोरोनाचा वेग

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 6 जून 2020

वरळी व प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर २.२ टक्के इतका कमी झाला आहे. या भागात आत्तापर्यंत २२०० रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड व कुलाबा विभागातील रुग्णवाढीचा दर अनुक्रमे २.६. व २.७ टक्के इतका कमी झाला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड व भांडुप या विभागांतील रुग्णवाढीचा दर कमी मागील आठवड्याभरापासून कमी होत चालला आहे

मुंबई :मे महिन्यात करोनाने थैमान घातलेल्या विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत असल्याने पालिकेने अधिक जोरकसपणे उपाययोजना सुरू केल्या आहेत. विभागनिहाय दर आणखी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रूझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे. धारावी, दादर, माहीम या भागांतील रुग्णवाढीचा दर २.४ टक्के इतका खाली आला आहे. या भागांत आत्तापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत करोनाचे सर्वाधिक ३२०० रुग्ण सापडले आहेत.मुंबईत अद्याप करोना साथीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नसले तरी या विषाणूची लागण होण्याचा वेग मंदावत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत असलेले दररोज ६.६२ टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आता ३.५० टक्क्यांवर आले आहे. 'हॉटस्पॉट' ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांवरून १.६ ते २.४ टक्के इतका खाली आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे.

मुंबईत शुक्रवारी सर्वाधिक ७.४ टक्के रुग्णवाढ पी-उत्तर मालाड विभागात नोंदवण्यात आली. दहिसर विभागात सुरुवातीला शहरातील अन्य विभागांपेक्षा जास्त रुग्णवाढ होती. ती खाली येत ६.४ टक्के इतकी झाली आहे. घाटकोपरला रुग्णवाढीचा दर ४.५ इतका आहे. पश्चिम उपनगरात मालाड ते दहिसरपर्यंत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे.मुंबईच्या बाबत सर्वात समाधानाची बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून अनेक विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर दररोज एक ते दोन टक्क्यांनी खाली येत चालला आहे.

वरळी व प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर २.२ टक्के इतका कमी झाला आहे. या भागात आत्तापर्यंत २२०० रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड व कुलाबा विभागातील रुग्णवाढीचा दर अनुक्रमे २.६. व २.७ टक्के इतका कमी झाला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड व भांडुप या विभागांतील रुग्णवाढीचा दर कमी मागील आठवड्याभरापासून कमी होत चालला आहे. सध्या या भागात ४.५ ते ६.७ इतका रुग्णवाढीचा दर आहे.

 

WebTittle :: Read | .... and the speed of the corona in Mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live