वाचा | आणखी एका पोलिसांचा कोरोनाने घेतला जीव  

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 जुलै 2020

मुंबईसह राज्यभरात पोलिसांना करोनाने हैराण केले आहे. आतापर्यंत राज्यात ७३ पोलिसांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. यात एकट्या मुंबईतच ४५ पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात गेले साडेतीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आला आहे.

 

राज्यात करोना साथीने हाहाकार उडवला आहे. करोना बाधितांचा आकडा नेहमीच चढता राहिला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी करोना बाधित २१९ रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ६८७५ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ६८, ठाणे शहरात २०, कल्याण डोंबिवलीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी राज्यात २४ तासांत ६८७५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहचली आहे. त्यात ९३,६५२ इतकी अॅक्टिव रुग्णांची संख्या असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील करोनाचे आकडे चिंता वाढवणारे आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेले काही दिवस मुंबईपेक्षा ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. ठाण्यात सद्यस्थितीत ३० हजार ५०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३ हजार ७८५ इतकी आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ८९ हजार १२४ जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील ६० हजार १९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ५१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५४८११ इतकी झाली असून त्यातील २२८२१ रुग्ण बरे झाले आहेत तर १४८३ रग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह राज्यभरात पोलिसांना करोनाने हैराण केले आहे. आतापर्यंत राज्यात ७३ पोलिसांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. यात एकट्या मुंबईतच ४५ पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात गेले साडेतीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आला आहे. आपले आरोग्य धोक्यात घालून पोलीस ड्युटी बजावत आहेत. त्यातूनच पोलीस दल करोनाने बेजार झालं आहे. पोलीस दलातील करोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे.

भांडुप पोलीस ठाण्याचे हवालदार कैलास दाभाडे (४६) यांचा बुधवारी करोनाने मृत्यू झाला होता. बदलापूर येथे वास्तव्यास असलेल्या दाभाडे यांना ६ जुलैला त्रास होऊ लागल्याने त्यांना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर आज आणखी एका पोलिसाला करोनाचे शिकार व्हावे लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

WebTittle :: Read | Another policeman was killed by Corona

 


संबंधित बातम्या

Saam TV Live