नक्की वाचा | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कशी झाली संजय लीला भन्साळी यांची चौकशी

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 7 जुलै 2020

पोलिसांनी त्यांना सुशांतशी संबंधित विचारलेल्या १२ ते १५ प्रश्नांची त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह उत्तरे दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
याआधी सुशांत आत्महत्याप्रकरणी २७ जूनला यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा हिची चौकशी पोलिसांनी केली.भन्साळी यांना गेल्या आठवड्यात वांद्रे पोलिसांनी चौकशी तसेच जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स पाठविले होते.

मुंबई :   सुशांतला आॅफर केलेले चार चित्रपट न मिळण्याचे खरे कारण काय? त्याला बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट’ केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वांद्रे पोलीस करत असून त्या अनुषंगाने भन्साळी यांचा जबाब नोंदवण्यात आला. आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी सोमवारी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले. 

यशराजसोबतच्या तीन चित्रपट करारांची प्रतही पोलिसांनी मिळवली. यशराजसोबत करार झाल्याने भन्साळींच्या ‘गोलियों की रामलीला’ व ‘बाजीराव मस्तानी’साठी सुशांत तारखा देऊ शकला नाही, अशी चर्चा आहे.
‘बाजीराव मस्तानी’ दरम्यान सुशांत हा शेखर कपूर यांच्या ‘पानी’साठी काम करत होता. मात्र वर्षभर चित्रपट अडकवून नंतर तो बंद करण्यात आला. सुशांतला जाणीवपूर्वक डावलले गेले का? याचा आत्महत्येशी संबंध आहे का, आदी प्रश्नांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पोलिसांनी त्यांना सुशांतशी संबंधित विचारलेल्या १२ ते १५ प्रश्नांची त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह उत्तरे दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
याआधी सुशांत आत्महत्याप्रकरणी २७ जूनला यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा हिची चौकशी पोलिसांनी केली.भन्साळी यांना गेल्या आठवड्यात वांद्रे पोलिसांनी चौकशी तसेच जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स पाठविले होते. शनिवारीच त्यांचा जबाब नोंदविला जाणार होता. मात्र दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ते ६ जुलै म्हणजे सोमवारी दुपारी ठरल्यानुसार, सव्वाएकच्या सुमारास पोलीस ठाण्यात कायदेशीर सल्लागार व सुरक्षारक्षकासह हजर झाले. तोंडावर मास्क घातलेल्या भन्साळी यांना वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उत्तर न देता ते थेट चौकशी कक्षात शिरले.

WebTittle :: Read Branch | Actress Sushant Singh Rajput suicide case known Sanjay Leela Kasali Chowk


संबंधित बातम्या

Saam TV Live