वाचा | 'या' देशाने केला करोनाविरोधातील पहिली लढाई जिंकल्याचा दावा

वाचा | 'या' देशाने केला करोनाविरोधातील पहिली लढाई जिंकल्याचा दावा

पॅरिस: करोना व्हायरस संसर्गाचा तडाखा सहन केल्यानंतर फ्रान्समध्ये सोमवारपासून लॉकडाउन मागे घेण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्यामुळे एकाच ठिकाणी नागरिकांनी एकत्र जमणे टाळण्याचे आवाहनही राष्ट्राध्यक्षांनी केले. तर, २८ जून रोजी स्थानिक महापालिका निवडणुका जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सने एक महिन्याआधी आठ आठवड्यांचा लॉकडाउन मागे घेतला होता. त्यानंतर करोनाबाधितांची संख्या फारशी वाढली नसून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. करोनाचा धोका संपला नसून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रो यांनी करोनाविरोधातील पहिली लढाई जिंकली असल्याचा दावा केला असून सर्व व्यवसाय, उद्योग, रेस्टोरंट्स, बारवरील निर्बंध हटवण्यात आले असल्याची घोषणा केली.


चीनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बीजिंगमधील १० ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. शहराच्या सर्व एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर करोना चाचणीसाठी टेस्टिंग स्टेशन उभारले आहेत. त्याशिवाय लोकांना बीजिंग बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वुहान प्रमाणेच बीजिंगमधील जवळपास दोन कोटी नागरिकांची करोना चाचणी करण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन करोनाबाधित रुग्णांमध्ये करोना आजाराची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र, या रुग्णांकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे.रविवारी रात्री उशिरा राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रो यांनी याबाबत घोषणा केली. एका आठवड्यात शाळा, महाविद्यालये आणि नर्सरीदेखील सुरू करण्यात येणार आहेत. मॅक्रो यांनी सांगितले की, मयोटी आणि गुयाना यांना सोडून अन्य ठिकाणे ही ग्रीन झोन असणार आहेत. पॅरिसमध्ये सर्व कॅफे आणि रेस्टोरंट्स सुरू करण्यात येणार आहे. देशात सोशल डिस्टेंसिंगचेही पालन सर्वांनाच करावे लागणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क घालणे सक्तीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय युरोपीयन देशांमध्ये प्रवास करण्यास परवानगी असल्याचे त्यांनी जाहीर केले. एक जुलैनंतर करोनाच्या संसर्गावर मात केलेल्या युरोपबाहेरील देशांमध्ये प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

WebTittle :: Read | This country won its first battle against the Corona

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com