नक्की वाचा | आता भारतानंतर अमेरिका घालणार 'या'अ‍ॅप्सवर बंदी

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 7 जुलै 2020

अमेरिकादेखील ही बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे

हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं.

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकादेखील ही बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. “आत्ता या विषयावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही, काही ठरलेलं नाही. परंतु ही बाब अशी आहे की आम्ही निश्चितच विचार करत आहोत”, असं माइक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

WebTittle ::Read exactly | After India, US will ban 'Ya' apps


संबंधित बातम्या

Saam TV Live