नक्की वाचा | ... आणि कोरोना थांबेना

नक्की वाचा | ... आणि कोरोना थांबेना

करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असले, तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अंबरनाथ येथील झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे.ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या शनिवारीही कायम राहिली असून दिवसअखेर एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९४४ इतकी झाली आहे. आतापर्यंत ९४७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १४ हजार ४४ रुग्ण करोनामुक्त झाले असून १३ हजार ९५३ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

गेले काही दिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या अंबरनाथमध्येही शनिवार संध्याकाळपर्यंत १४० नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १६३६ इतकी झाली आहे. उल्हानगरमध्ये ६०, तर बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहरातही शनिवारी दिवसभरात १५० नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत.ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी अनुक्रमे ३७१ आणि ४३६ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी १४ रुग्ण करोनामुळे दगावले, तर कल्याण-डोंबिवलीत पाच जणांचा मृत्यू झाला.

ठाण्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ७७३ रुग्ण आढळले असून ५१८ जण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.गेले काही दिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या अंबरनाथमध्येही शनिवार संध्याकाळपर्यंत १४० नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १६३६ इतकी झाली आहे. उल्हानगरमध्ये ६०, तर बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहरातही शनिवारी दिवसभरात १५० नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत.

WebTittle:Read exactly | ... and Corona won't stop

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com