नक्की वाचा | केंद्र सरकार 'त्या' क्रूर मारेकऱ्यांना सोडणार नाही

नक्की वाचा | केंद्र सरकार 'त्या' क्रूर मारेकऱ्यांना सोडणार नाही


मलप्पुरम: भुकेल्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालण्यात आले. ते अननस खात असतानाच तिच्या तोंडातच फटाक्यांचा स्फोट झाला आणि तिचे तोंड फुटले. हत्तीणीच्या तोडाला प्रचंड जखमा झाल्या. या अवस्थेत ती जंगलाकडे पळत निघाली. अखेर त्रास सहन होत नाही असे पाहून हत्तीणीने वेलियार नदीत जाऊन पाण्यात तोंड बुडवून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. वन विभागाचे कर्मचारी तिच्या मदतीसाठी धावले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर हत्तीणीने पाण्यातच प्राण सोडले. त्यानंतर या हत्तीणीवर वन विभागाने अंत्यसंस्कार केले.

 केरळच्या वन मंत्रालयाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून या हत्तीणीच्या मृत्यूचा अहवाल मागितला आहे, असे केरळचे वनमंत्री के. राजू यांनी माहिती देताना सांगितले. या बरोबरच या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे केरळचे वन संरक्षण मुख्य सचिव सुरेंद्र कुमार यांनी सांगितले.

केरळमधील मलप्पुरम येथे एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके खायला घातल्याने या हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला. याचे पडसाद देशभर उमटले. या अमानुष प्रकाराची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या प्रकाराची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून दोषींना माफ केले जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. प्राण्याला फटाके खायला घालून त्यांना मारणे ही भारतीय संस्कृती नाही, असेही जावडेकर म्हणाले. लवकरच दोषींना हुडकून काढण्याचे काम करण्यात येईल असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

WebTittle : Read exactly | The central government will not release 'those' brutal killers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com