नक्की वाचा | महाराष्ट्रात पंतजलीच्या कोरोनिलला बंदी

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 25 जून 2020

पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे.

 

करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.

पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live