नक्की वाचा | मुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 28 मे 2020

अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले..

मुंबई: मुंबईत मेट्रो सिनेमाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनला आग लागल्याची घटना घडली.रात्रीच्या दरम्यान हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली.यावेळी या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉक्टरांमध्ये एकच गोंधळ उडाला.दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.यावेळी हॉटेलमध्ये आगीच्या  विळख्यात अडकलेल्या २५ डॉक्टरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले..

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अवघ्या काही वेळात आगीच्या विळख्यातून २५ डॉक्टरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून बाकी कुणी हॉटेलमध्ये अडकलं आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २५ डॉक्टरांचे प्राण वाचू शकले आहेत.
 
WebTittle :: Read exactly | Fire at Hotel Fortune in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live