नक्की वाचा| इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

नक्की वाचा| इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग



मुंबई : आज डिझेल सरासरी ४५ ते ५० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलच्या भावात मात्र कोणतीही वाढ झाली नाही. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तर डिझेल ७८.२२ रुपये झाला आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत ४६ पैशांची वाढ झाली. मंगळवारी मुंबईत डिझेल ७७.७६ रुपये होते.पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. सलग १८ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. विशेष म्हणून डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली.

देशभरात ही दरवाढ झाली असून प्रत्येक राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार (व्हॅट) दोन्ही इंधनांचे दर बदलते राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या किरकोळ दरामध्ये करांचा वाटा एकूण दराच्या दोन तृतीयांश असतो. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.

आजतागायत दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या इतर शहरांच्या तुलनेत कमी होत्या. येथे इंधनावरील स्थानिक कर कमी असल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होते. मात्र गेल्याच महिन्यात दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट १६.७५ टक्क्यांवरून ३० टक्के केला. तर पेट्रोलवरील व्हॅट २७ टक्क्यांवरून ३० टक्के केला. यामुळे पेट्रोल १.६७ रुपयांनी तर डिझेल थेट ७.१० रुपयांनी महागले होते. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या सलग १८ दिवस इंधन दरवाढीने पेट्रोलच्या तुलनेत डिझेल मोठ्या प्रमाणात महाग झाले. पेट्रोल आणि डिझेलमधील तफावत कमी झाली. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर असून डिझेलचा भाव मात्र ७९.८८ रुपये झाला आहे.


करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली. १८ दिवसांत पेट्रोल ८.५० रुपयांनी तर डिझेल १०.४८ रुपयांनी महागले आहे.आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे.कोलकात्यात आज पेट्रोल ८१.४५ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलने ८३.०४ रुपयांवर कायम आहे. कोलकात्यात डिझेल ७७.०६ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.१७ रुपयांचा स्तर गाठला आहे.दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. त्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत.
 

WebTittle ::Read exactly | For the first time in history, diesel is more expensive than petrol

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com