नक्की वाचा | हवामान खात्याने दिला हा अंदाज 

नक्की वाचा | हवामान खात्याने दिला हा अंदाज 

मुंबई: मुंबईत सकाळी ९ वाजल्यानंतर अचानक हवामानात बदल झाला असून ढग दाटून मुसळधार पाऊस मुंबईत सर्वत्र कोसळत आहे. उपनगरात पावसाला अधिक जोर आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात सर्व भागांत गेल्या तासाभरापासून पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचायला सुरुवात झाली असून किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळल्यानंतर आजचा दिवस मुंबईसाठी पावसाचा ठरला असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. 

मुंबईत मान्सूनच्या आगमनाला अजून काही दिवसांचा अवकाश आहे. अशावेळी सकाळीच सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक बनलं आहे.
पालघर जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळत आहे. पालघर शहर, सातपाटी, वाडा या भागांत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. सध्या पालघरमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे.निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवर धडकल्यानंतर मुंबईकडे सरकेल असा अंदाज होता मात्र या वादळाची दिशा बदलली आणि मुंबई वादळापासून बचावली. मुंबईत बुधवारी पाऊसही तुरळक झाला. ही कसर पाऊस आज भरून काढताना दिसत आहे.


हवामान विभागाने याआधीच चार दिवस कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.हवामान विभागाने सकाळी साडेनऊ वाजता पावसाबाबत अॅलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला असून पुढील तीन तासांत या जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com