नक्की वाचा | कोरोना कसा रूप बदलतोय,  कोरोनामुळे पुढे काय होणार?

नक्की वाचा | कोरोना कसा रूप बदलतोय,  कोरोनामुळे पुढे काय होणार?

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस आता आपली क्षमता गमावत असून तो कमी प्राणघातक होतो आहे. गेल्या 10 दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरसची क्षमत कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी केला आहे. 

देशासह राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट वाढलाय.  मार्चच्या तुलनेत मे महिन्यामध्ये कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. ३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी  २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर देशाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर रोज सरासरी 8 हजार रुग्ण वाढत आहेत. तर सरासरी 4 हजार रुग्ण रिकवर होत असल्याचं समोर आलंय. मार्चमध्ये देशाचा रिकवरी रेट 10 टक्के होता. आता तो वाढला असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. 


जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरत आतापर्यत एकूण 6,185,076 जणांना कोरोनाची लागण झाली असून 371,398 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  भारतातही कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. जगाचा विचार केल्यास भारत सध्या सातव्या स्थानावर आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांच्या पुढे आहे. तर मृतांचा आकडा साडे पाच हजारांच्या आसपास आहे.
चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. चीननं कोरोना संकट नियंत्रणात आणलं असलं, तरी अद्याप अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. कोरोनावर मात करणयासाठी सर्व देशांतील सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. 
 

WebTitle :: Read exactly | How does the corona change shape, what will happen next because of the corona?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com