नक्की वाचा | राज्यातील वीज बिलांच्या वसुलीवर कसा होतोय परिणाम 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 11 जून 2020

महावितरणच्या कारभाराला आणि ग्राहकांच्या वर्तणुकीला शिस्त लागली नाही तर येणारा काळ कठीण असेल. दरवाढ आणि भविष्यातील विजेचे संकट टाळायचे असेल तर ग्राहकांनी प्रामाणिकपणे बिल भरायला हवे, असे मत या क्षेत्रातले अभ्यासक महेंद्र जिजकर यांनी व्यक्त केले आहे.सुमारे ५० हजार कोटींची तूट भरून काढण्याची गरज व्यक्त करत महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची परवानगी मागितली होती.

मुंबई : महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तूट आधीच वाढलेली आहे. त्यामुळे बिल भरणा होत नसल्याचे कारण पुढे करून ते कर्ज काढले जात आहे. ६ महिन्यांच्या अल्प मुदतीसाठी आणि किमान ४ टक्के व्याज दराने जरी हे कर्ज काढले तरी ते कर्ज आणि व्याजाची रक्कमही वीज ग्राहकांकडूनच महावितरण वसूल करेल, अशी भीती वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी व्यक्त केली आहे. महावितरणच नाही तर वीज ग्राहकांची अभूतपूर्व कोंडी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

महावितरणच्या कारभाराला आणि ग्राहकांच्या वर्तणुकीला शिस्त लागली नाही तर येणारा काळ कठीण असेल. दरवाढ आणि भविष्यातील विजेचे संकट टाळायचे असेल तर ग्राहकांनी प्रामाणिकपणे बिल भरायला हवे, असे मत या क्षेत्रातले अभ्यासक महेंद्र जिजकर यांनी व्यक्त केले आहे.सुमारे ५० हजार कोटींची तूट भरून काढण्याची गरज व्यक्त करत महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची परवानगी मागितली होती. मात्र, मार्च महिन्यात आयोगाने दिलेल्या निर्णयात अपेक्षित दरवाढ मिळालेली नाही. त्यामुळे तूट भरून काढणे अवघड झाले आहे. त्यापाठोपाठ लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे क्रॉस सबसिडीचे गणितही बिघडले असून वीज खरेदी आणि विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातील तूट वाढली आहे. मार्च महिन्यात ५०८७ कोटींच्या बिलापैकी ६१३ कोटींची थकबाकी होती. एप्रिल आणि मे महिन्यांत अनुक्रमे ३१०० आणि ३५०० कोटींची बिले पाठविली. मात्र, त्यापैकी ९०० आणि १४६० कोटींचा भरणाच झालेला नाही. 

WebTittle  :: Read exactly | How it affects the recovery of electricity bills in the state

 


संबंधित बातम्या

Saam TV Live