नक्की वाचा | 'या' देशात कोरोनाला बरं करणाऱ्या औषधाची सुरूवात

नक्की वाचा | 'या' देशात कोरोनाला बरं करणाऱ्या औषधाची सुरूवात


सध्या करोनावर लस उपलब्ध नाही. तसेच जगभरामध्ये सुरु असणाऱ्या चाचण्यामध्ये अद्याप परिणामकारक असे निकाल हाती आलेले नसल्याने लस बनवण्यासाठी आणखीन काही कालावधी लागणार आहे. आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार केमरारच्या माध्यमातून महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येईल इतक्या प्रमाणात औषध बनवण्याची योजना आहे. दहाहून अधिक देशांनी आताच एविफेविरची मागणी केली असल्याचेही दिमित्रीव्ह यांनी स्पष्ट केलं.
एविफेविर असं या औषधाचे नाव आहे. हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती रशियामधील रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सार्वभौमत्व अधिकार असणाऱ्या मंडळाने प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे. हे औषध बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात आली असून त्यामध्ये केमरार या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे.

या औषधाच्या क्लिनीकल चाचण्या अगदी अल्पावधीमध्ये करण्यात आल्या आहेत. या औषधाची मागणी आणि गरज लक्षात घेता विशेष नियमांअंतर्गत आरोग्य मंत्रालयाने या औषधाच्या वापराला तातडीने परवानगी दिली आहे. इतर देशांमध्ये वेगवेगळ्या लस आणि त्यासंबंधित संशोधन आणि क्लिनीकल ट्रायल मोठ्या संख्येने सुरु असतानाच रशियाने मात्र कमी लोकांवर याचा प्रयोग करत औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे. या औषधाच्या चाचण्यांदरम्यान  बुहतांश रुग्ण हे चार दिवस पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आल्याचा दावा आरडीआयएफने मागील आठवड्यामध्ये केला होता. त्यामुळेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या औषधाच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.

रशियामधील सर्व भागांमध्ये हे औषध पोहचवण्याचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारी ८० हून अधिक प्रांतांपैकी सात प्रांतांमध्ये हे औषध पोहचवण्यात आलं आहे. येथील रुग्णालये आणि क्लिनिक्समध्ये हे औषध वापरण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या आहेत.
जगभरामध्ये करोनावरील लसीवर संशोधन सुरु असतानाच गुरुवारी रशियाने करोनावर उपचार करण्यासाठी एका औषधाची अधिकृत घोषणा केली. रशियामधील करोनाबाधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला असून याच पार्श्वभूमीवर तेथील करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रशियाने एका अ‍ॅण्टी व्हायरल औषधाला अधिकृत मान्यता दिली आहे. हे औषध बनवण्यासाठी गुंतवणूकदारांनीच ही माहिती दिली असल्याचे रॉयर्टसने म्हटलं आहे.

एविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो.फॅव्हीपीरावीर हे मूळचे जपानी औषध आहे. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी आठवडाभरापूर्वी स्पष्ट केलं होतं.

रशियामध्ये करोनाबाधितांची संख्या ५ लाख २ हजार ४३६ इतकी होती. सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये रशिया तिसऱ्या स्थानी असून केवळ अमेरिका आणि ब्राझीलमध्ये रशियापेक्षा अधिक रुग्ण आहेत. असं असलं तरी रशियामध्ये मृत्यूदर कमी असून येथे करोनामुळे आतापर्यंत ६ हजार ५३२ मृत्यू झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com