नक्की वाचा | महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नक्की वाचा | महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

‘गेल्या चार-पाच दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगदू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली.चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असं सांगत महाराष्ट्र सायबर सेलने महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसात चीनमधून 40 हजारांहून जास्त वेळेस सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मंगळवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. चिनी हॅकर्स तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल किवा मेसेज पाठवू शकतात. Free Covid Test, Free Covid-19Kit अशा विषयाचा मेल किंवा मेसेज पाठवून काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाऊ शकते असेल. हा फेक ईमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. covid2019@gov.in किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये

सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा , अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com