नक्की वाचा | आता कोरोनाची नवी लक्षण

नक्की वाचा | आता  कोरोनाची नवी लक्षण


वॉशिंग्टन: करोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला असल्यामुळे चीनमधूनच करोनाचा संसर्ग फैलावला असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच जागतिक राजकारण ढवळून निघाले असताना स्पेनमधील बर्सिलोना विद्यापीठाने नवीन माहिती जाहीर केली आहे. चीनपेक्षा नऊ महिने आधी स्पेनमध्ये करोनाचा विषाणू असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

सुका खोकला, ताप, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आधी लक्षणे करोनाबाधितांची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने करोनाची आणखी तीन लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये नाक सतत वाहणे, अतिसार आणि उलटी ही लक्षणे करोनाच्या आजाराची असू शकतात. या आजारांना सामान्य आजार न समजण्याचा सल्ला 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने (सीडीसी) दिला आहे

जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून एक कोटींहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे. करोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हाने वाढत आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने करोनाची तीन लक्षणे सांगितले.

सतत मळमळल्यासारखे वाटणे हे सामान्य लक्षण नसल्याचे 'सीडीसी'ने म्हटले आहे. ही लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने तातडीने आयसोलेशनमध्ये जाण्याची आवश्यकता असल्याचे 'सीडीसी'ने म्हटले. नाक सतत वाहणे हे करोनाच्या लक्षणात आढळले नव्हते. त्याशिवाय सतत नाक वाहत असेल आणि अस्वस्थ वाटत असेल तर त्या व्यक्तीला करोनाची बाधा असण्याची शक्यता आहे. काही करोनाबााधित रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळली असल्याचे समोर आले असल्याचे 'सीडीसी'ने म्हटले आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसत असल्याचे 'सीडीसी'ने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिसाराचा त्रास होत असल्यास त्याला करोनाचा संसर्ग असण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तीची तातडीने करोना चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे 'सीडीसी'ने म्हटले आहे. त्याशिवाय सतत मळमळल्यासारखे वाटणे हे लक्षणंदेखील करोनाचे लक्षण असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.

त्याशिवाय, सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशननुसार थंडी वाजणे, कफ होणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे, अंगदुखी, डोके दुखी होणे, चव न जाणवणे आदी लक्षणे आढळल्यास करोनाची लक्षणे समजून चाचणी करायला हवी असे 'सीडीसी'ने म्हटले आहे.

WebTittle ::Read exactly | Now Corona's new sign

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com