नक्की वाचा | आता कोण करू शकणार रेल्वेने प्रवास

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 3 जुलै 2020

अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं तसं पत्रकच जारी केलं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासावरून सुरू असलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई: भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यावर आज अंतिम निर्णय जाहीर केला आहे, असं सांगतानाच शेलार यांनी शहा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत.

अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं तसं पत्रकच जारी केलं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासावरून सुरू असलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे.

आशिष शेलार यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शेलार यांनी आपली मागणी मान्य झाल्याचं ट्विटही केलं होतं. पण मध्य रेल्वेने त्याला दुजोरा दिला नव्हता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याचे कोणतेही आदेश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले नसल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनेही रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास मुभा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने ही मागणी मंजूर केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी देण्यात आल्याचं सांगतानाच मध्य रेल्वेने आज जारी केलेल्या या पत्रकात कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, त्यांची यादीच दिली आहे. एकूण १५ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

 

>> नवी मुंबई महापालिका कर्मचारी

>> मुंबई पोलीस, बेस्ट आणि मंत्रालयीन कर्मचारी

>> सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयातील कर्मचारी

>> मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन कर्मचारी (एमआरव्हीसी)

>> संबधित प्रशासनाकडून प्रवासाची परवानगी देण्यात आलेले विशेष सेवेतील कर्मचारी

>> संरक्षण विभाग, केंद्रीय कर्मचारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी

>> आयटी, जीएसटी कस्टम आणि पोस्ट विभागातील कर्मचारी

>> मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित आणि राजभवनातील कर्मचारी

>> रेल्वे आणि पीएसयूचे कंत्राटी कामगार

>> मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी

>> ठाणे महापालिकेचे कर्मचारी

>> वसई-विरार महापालिका कर्मचारी

>> पालघर महापालिका कर्मचारी

>> कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचारी

>> मिरा-भायंदर महापालिका कर्मचारी

WebTittle :: Read exactly | Now who can travel by train


संबंधित बातम्या

Saam TV Live