नक्की वाचा| आजचा सोन्याचा भाव

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 24 जून 2020

चीनसारख्या अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने कच्च्या तेलातील नफ्याला मर्यादा आल्या. जगात तेलाला आधीच कमी मागणी आहे, तसेच हवाई आणि रस्ते वाहतुकीवरील निर्बंधांमुळेही तेलाच्या किंमतीतील वाढ रोखली गेली आहे.कच्च्या तेलाचे दर ४० डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले आहेत. ओपेकने तीव्र उत्पादन कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हे परिणाम दिसून आले. 

मुंबई : करोना व्हायरसने पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांत डोकं वर काढले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. तसे झाले तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव १८०० डॉलरपर्यंत वाढण्यास वेळ लागणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे.

अमेरिका तसेच चीनमधील काही भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम राहिल्याने सोन्याच्या किंमतीत ०.७ टक्क्यांची वाढ होऊन ते १७५४.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. साथीच्या आजाराभोवतीच्या अनिश्चिततेने सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे बाजाराच कल असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे बिगर कृषी वायदा व चलन विभागाचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने निराशात्मक वास्तवाकडे संकेत दर्शवले आहेत. ते म्हणजे पुरेशा प्रमाणात उपाययोजना न केल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढतच आहे. जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) ०.७ टक्क्याने वाढून १७६७ डॉलर प्रती औंस झाले. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत १६ टक्के वाढ झाली आहे.

चीनसारख्या अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने कच्च्या तेलातील नफ्याला मर्यादा आल्या. जगात तेलाला आधीच कमी मागणी आहे, तसेच हवाई आणि रस्ते वाहतुकीवरील निर्बंधांमुळेही तेलाच्या किंमतीतील वाढ रोखली गेली आहे.कच्च्या तेलाचे दर ४० डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले आहेत. ओपेकने तीव्र उत्पादन कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हे परिणाम दिसून आले. 

आज बुधवारी कमॉडिटी बाजारात सोने ४८२८१ रुपयांपर्यंत वाढले. त्यात ०.१० टक्क्याची वाढ झाली. चांदीचा भाव मात्र ४८७५४ रुपये असून त्यात ३० रुपयांची घसरण झाली आहे.अमेरिका तसेच चीनमधील काही भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम राहिल्याने सोन्याच्या किंमतीतील तेजी कायम आहे. आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६६० रुपये आहे. त्यात कालच्या तुलनेत ५० रुपयांची वाढ झाली. २४ कॅरेटचा भाव ४७६६० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४६८१० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८०१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७५१० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८८०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६११० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०४०० रुपये झाला आहे. त्यात १८० रुपयांची घसरण झाली.

WebTittle ::Read exactly | Today's gold price

 


संबंधित बातम्या

Saam TV Live