नक्की वाचा | कोणत्या अभिनेत्रीनं केला गुपचुप साखरपुडा 

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 19 मे 2020

. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून या वर्षी दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साखरपुडा सोहळ्याला केवळ घरच्यांची उपस्थिती होती. अगदी घरगुती पद्धतीनं हा सोहळा पार पडला होता. 

मुंबई: तिच्या बर्थडेच्या दिवशी  तिनं चाहत्यांसोबत खास बातमी शेअर केली आहे.  सिनेसृष्टीची  अप्सरा  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने साखरपुडा केला. पण हा साखरपुडा तिने २ फेब्रुवारी २०२० रोजी केलाय. काही महिन्यांपूर्वी सोनालीनं तिच्या आयुष्यातील 'मितवा' कोण आहे हे सांगितलं होतं. तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या होणाऱ्या पार्टनरची ओळख करून दिली होती. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून या वर्षी दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साखरपुडा सोहळ्याला केवळ घरच्यांची उपस्थिती होती. अगदी घरगुती पद्धतीनं हा सोहळा पार पडला होता. 
 
सोनालीनं तिच्या ड्रिम वेडिंगबद्दलदेखील सांगितलयं.. सोनालीची आई पंजाबी असल्यामुळे तिला पंजाबी पध्दतीनं लग्न करायचयं तर याशिवाय  ख्रिश्चन लग्नांविषयी आकर्षण असल्यामुळं ख्रिश्चन वेडींग करायला आवडेल. तसंच जोडीदाराला आवडणाऱ्या पद्धतीनंही लग्न करायचंय,  तसचं  सोनालीला मराठी पध्दतीनं देखील लग्न करायचं आहे. 

WebTittle :Read exactly | Which actress secretly made sugarplum?


  


संबंधित बातम्या

Saam TV Live