वाचा | मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक बळी

वाचा | मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक बळी

मुंबई: राज्यात आज दगावलेल्या १५२ रुग्णांपैकी ९७ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे ९, कल्याण-डोंबिवलीत ७, नवी मुंबईत ४, वसई-विरारमध्ये २, नाशिकमध्ये ५, औरंगाबादमध्ये ६, लातूरमध्ये २, पुणे आणि सोलापुरात प्रत्येकी ८, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये १०२ पुरुष आणि ५० महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी ६० वर्षांवरील ८५, ४० ते ५९ वयोगटातील ५४ आणि ४० वर्षांखालील १३ रुग्णांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी १०७ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.राज्यातील करोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात १५२ करोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ३ हजार ५९० झाली आहे. राज्यात आज ३ हजार ६०७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ९७ हजार ६४८वर गेली आहे. त्याशिवाय आज १ हजार ५६१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार ७८ झाली आहे.

राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

१५२ मृतांपैकी ३५ रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर इतर रुग्णांचा मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत ११७जण दगावले. त्यात मुंबईतील ८७, मिरा भाईंदर येथील ८, कल्याण-डोंबिवली आणि सोलापूर येथील प्रत्येकी ७, नवी मुंबईतील ४, नाशिकमधील ३ आणि वसई-विरारमधील एकाचा समावेश आहे.

Read | The highest number of corona victims in Mumbai

 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com